अभिमान मराठी असण्याचा
अभिमान मराठी असण्याचा


मराठी बोलण्यात नव्हे
रक्तात असावी लागते,
जिच्या मातीत जन्मलो आम्ही
तिचे ऋण फेडायलाच लागते
मराठी भाषा बोलायला
लाजते आजकालची पिढी,
वाटतं त्यांना आठवण करून द्यावी
कशासाठी होती हिंदवी स्वराज्याची ही लढी
आपुलकी प्रेम आदर संस्कृती
हीच माझ्या भाषेची शोभा,
ओव्या अभंगाने भरलेला ठेवा
हाच तर माझ्या मराठीचा गाभा
सर्वधर्मसमभाव ही
माझ्या महाराष्ट्राची शान,
मराठी असण्याचा का नसावा
आम्हाला अभिमान?
मराठी भाषा गौरव दिन
कुसुमाग्रजांच्या या जन्मदिनी,
अभिमानाने छाती फुगते
अशा अनेक मराठी प्रेमींच्या आठवणींनी