पाऊलवाट
पाऊलवाट
1 min
321
आयुष्य हे सुखवेडे
मन ते ध्येयवेडे
आठवणींची साठण
करते पाऊलवाट
क्षितिजापालिकडे जग पाहण्यास
मन उधाण वाहू लागते
त्या वाहणाऱ्या मनालाही
सहनशीलता शिकवते पाऊलवाट
सतत पुढे जाणे
हा एकच नारा तिचा
दुःख मागे टाकूनी
सुखाचा शोध घेते हि पाऊलवाट
रोज नवा आशेचा किरण
नेत्रांवरती तरंगत
अश्रूंना हि सावरण्याची
जिद्द देते हि पाऊलवाट
माझ्या शेतकरी बापाच्या
स्वप्नांनाही पंख देत
त्याच्या पायाला न बोचण्याची
काळजी घेते हि पाऊलवाट
पडत असेन, रडत असेन
डोळे पुसून पुन्हा उठून
त्याच वाटेवर दिसेन
अपयशयातून शिकवणारी ती पाऊलवाट
पुढे जाण्यास शिकवते
मागे पाहण्यास शिकवते
पाहिलेल्या त्या चुकांमधून
अलगद सावरायला देते
