तो प्रयत्न
तो प्रयत्न

1 min

105
नेत्रांवरती तरारणाऱ्या
त्या अविरत भावनांची
सांगड घालण्याचा तो निष्फळ प्रयत्न
मनाच्या कप्प्यावर
टप टप बरसणाऱ्या त्या आठवणींना
पुसून टाकण्याचा तो प्रयत्न
चातकाप्रमाणे ओढ लागलेल्या
त्या नवनवीन स्वप्नांना
साकारण्याचा तो अतोनात प्रयत्न
सारं काही विसरून
बेधुंद उनाड वावरणाऱ्या मनाला
पुन्हा जाग करण्याचा
तो आनंदी प्रयत्न
अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना
शक्य करून दाखवण्याचा
तो धडाडीचा प्रयत्न आणि फक्त प्रयत्न