STORYMIRROR

Snehal Kulkarni

Tragedy Fantasy Others

3  

Snehal Kulkarni

Tragedy Fantasy Others

खूप अवघड असतं

खूप अवघड असतं

1 min
245

डोळ्यात अश्रू असूनही

चेहऱ्यावर हसू दाखवयच असतं

मनात दुःख असूनही

ओठांवर आणता येत नसतं

हृदयात प्रेम असूनही

ते व्यक्त करता येत नसतं

भावनांची ओढ जरी असली

त्यावर बंधनांचा गाठोडे बांधलेलं असतं

आठवणींची साठण असली तरी

त्याचा उजाळा काढणेही शक्य नसतं

बोलायचं खूप काही असतं

शब्दांचं अपुरं पडणं असतं

चालता चालता मधेच थांबावं वाटतं

नियतीला ते कधी मान्य नसतं

खरंच..... खूप अवघड असतं

जिथं स्वतःच अस्तित्व संपुष्टात आलेलं भासतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy