STORYMIRROR

Balika Shinde

Tragedy

4  

Balika Shinde

Tragedy

वाटोळे

वाटोळे

1 min
27.8K


अंधारी ती रात्र वैऱ्याची ठरली...

सर्व जीव झोपेत असताना काळाने झडप घातली....


कधी कोणाला वाटलेच नाही की उद्याची सकाळ पाहता येणार नाही..

नवी स्वप्ने मनात साठवून निद्रेच्या अधीन झालोय खरे पण आपली सकाळ कधी होणारच नाही...


पाई पाई जमवून उभा केलेला तो संसार असा उध्वस्त होईल...

हसऱ्या डोळ्यात अश्रू जागा घेतील असे कधी भासलेच नाही..


काळ रुपाने सुनामी आली..

संसार सारा वाहून घेऊन गेली...

चिमुकल्या त्या बाळाची बाहुलीही नाही सोडली...


असा काय केला गुन्हा त्यांनी नियती त्यांच्यावर कोपली...

जिवनाचे साऱ्या क्षणात *वाटोळे* करून गेली....

*वाटोळे* करून गेली......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy