कसं जगावं
कसं जगावं
कसं जगावं तर अस जगावं
रडत असूनही हसत राहावं
दुःखात असूनही सुखात राहावं
कसं जगावं तर अस जगावं
वादळासमोर पर्वतासारखा उभं राहावं
नदीवरले धरण बनावं
कसं जगावं तर अस जगावं
गांधीजींचा बर्फ डोक्यावर ठेवून
सावरकरांच्या आगीत राहावं
कसं जगावं तर अस जगावं
ध्येयासाठी काय वाटेल ते करावं
आपलं सर्वस्व जणू अर्पुनी द्यावं
असं जगावं हे असंच जगावं
केवळ श्वासासाठी नव्हे तर
जगण्यासाठी जगणं असावं
