एक पडका वाडा
एक पडका वाडा
बघ ना ग सखे
हे काय होऊन बसलं
तुझ माझं स्वप्न कस
अस कोलमडून पडलं
प्रेमाने रचल्या भिंती ज्याच्या
होता विश्वासाचा पाया घातला
आनंदाच्या छपराखाली
होता संसार सुखाचा थाटला
ताटातूट तुझी माझी
का काळाने घाव घातला
आपल्या स्वप्नांचा राजवाडा
आता पडका वाडा झाला
एक पडका वाडा झाला...
