STORYMIRROR

Ranjana Khedkar

Tragedy

4  

Ranjana Khedkar

Tragedy

जेष्ठ नागरिक

जेष्ठ नागरिक

1 min
455

आज जेष्ठत्वच्या उंबरठ्यावरून 

हळूच मागे वळून बघतांना 

वाळू सम एक -एक दिवस 

अलवार हातातून निसटताना...


आयुष्याचा हा लेखा -जोखा 

स्वतःशीच बघत होते पडताळून 

अचानक एक चुणूक लागली 

म्हातारपण बसलं कुरवाळून 


जवाबदारीचा मी पूल बनून 

आयुष्याची सारी जमा पुंजी 

दिली लेकरात वाटून, वाटलं 

माझ्या उरल्या जीवनाची कुंजी 


सुख दुःखाच्या ऊनसावल्यांशी 

आंधळी कोशिंबीर खेळत होते 

तरी पण लेकरांच्या इच्छेसाठी 

रक्ताचं पाणी करून झटत होते 


तुझ्या कर्तव्याची वेळ येता   अडगळीतला कोनटा दिला

तू मला शेवटची भेट म्हणून 

का ?रे तूला माझा वीट आला?


उद्या तू ही होशील जेष्ठ नागरिक 

लेकरा घरचं पायपुसनं नाही 

कसा होशील उतराई, कारण 

म्हातारपण कुणा चुकले नाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy