STORYMIRROR

prashant khaire

Tragedy

4  

prashant khaire

Tragedy

कशी भागवू भूक या पोटाची

कशी भागवू भूक या पोटाची

1 min
644

रात्रीचा दिवस करून राबतो

तरी मिळत नाही भाकर कष्टाची

कुणा सांगू व्यथा काळ्या आई

कशी भागवू भूक या पोटाची


तुला हिरवा शालू नेसवताना

पायातून वाहते धार लाल रक्ताची

सजविण्यात तुला कंगाल झालो

कशी भागवू भूक या पोटाची


सुगीच्या दिवसात तुझ्या

नजर वाकडी लहरी ढगाची

बरसून अंग अंग ओरबडते

कशी भागवू भूक या पोटाची


जेव्हा जेव्हा तू बहरतेस

निलामी होते तुझ्या पिकांची

सारं व्यापारी,दलालांच्या घशात

कशी भागवू भूक या पोटाची


उद्योगपती,बिल्डर्स, नेते

साऱ्यांच्याच तू आहे प्रीतीची

टपून बसली गिधाडं सारी

कशी भागवू भूक या पोटाची


आता कायदाच तुला लुटायचा

नियत बहकली मग्रूर सरकारची

डोळ्या देखत तोडणार लचके

कशी भागवू भूक या पोटाची


मोडताहेत अर्थव्यस्थेचा कणा

गरज पुन्हा नव्या कृषिक्रांतीची

भूमीपुत्रच जर संपला इथे तर

कशी भागवाल भूक तुम्ही पोटाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy