ढाण्या वाघ
ढाण्या वाघ
1 min
325
समता, मानवतेची शाई
भरली स्वाभिमानी लेखणीत
अत्याचारावर केला प्रहार
उचणीच बांधले एकाच दावणीत
दीनांच्या झोपडीला शिवला
नाही सूर्यप्रकाश स्वातंत्र्याचा
ये आझादी झुठी है म्हणत
जागर केला संविधानाचा
श्रीमंतांच्या निर्दयी सृष्टीत
जातीवादाचा जुलमी वारा
गरिबांच्या न्याय्य हक्कासाठी
विद्रोह करतो तुझा फकिरा
भाषेनुसार हवी प्रांतरचना
मुंबईसह व्हावे एक राष्ट्र
क्रांतीगीत चळवळीचा श्वास
पेटून उठला संयुक्त महाराष्ट्र
विषमतेला उपडून फेकण्या
क्रूर मनुवादावर केलेस घाव
जगाला ठणकावून सांगितले
मानवमुक्तीचा मार्ग भीमराव
दीडच दिवस शिकला शाळा
पण घेतली ज्ञानसूर्याची आग
लोकशाहीर अण्णाभाऊ होता
अन्याय फाडणारा ढाण्या वाघ
