तिला मनमोकळे जगू द्या...
तिला मनमोकळे जगू द्या...
प्रोफाईलला फोटो
ठेवला तीने सुंदर
पाहताच त्यांचे मन
झाले की हो बिलींदर
आई बहीण बायको
विसर कसा पडतो
फोटो पाहून dp वरचा
हलकटांचा जीव जडतो
सुंदर असणे तिचे हा
नाही बर का तिचा गुन्हा
स्वतंत्र भारतात सध्या
स्त्री पारतंत्र्यातच पुन्हा
जगू द्या की तिला ही
कधी मनमुराद हसू द्या
बहिण म्हणून नको तर
स्त्री म्हणून थोडा आदर द्या
जाण ठेवा थोडीतरी
या भारतात राहण्याची
पशु नाहीत हो तुम्ही
लाज बाळगा स्वतःची
तिच्याही मनाचा एकदा
खरच तुम्ही करा विचार
एकच जन्म हा तीच
तुमच्यामुळे होईल बेकार
तुमच्या मनातील पाप
जगणे मुश्किल तिचे करते
मनासारखे जगणे मग
दिवा स्वप्न म्हणून राहते....
