नव्याने करू सुरुवात..
नव्याने करू सुरुवात..
चल ना नव्याने सुरुवात करू
तोडून मौनाचे कुलूप
घेऊयात ना पुढाकार
बोलून मनातले आता
नव्याने करूया ना सुरुवात
विसरून जाऊ झालेले
मनातली काढूयात अढी
नात्यातील दरी पार करून
नव्याने घालू नात्याची घडी
हसू खेळू बोलू आता
इगो जरा ठेवून बाजूला
'मी' का 'तू' करता करता
फुलस्टॉप लागेल आयुष्याला
"माफ करावे" चुकलेच काही
माणुसकी शिल्लक असेपर्यंत
जीव लावावा जीवास इथल्या
जीवात जीव असेल तोपर्यंत
नाते असल्यास महत्त्वाचे
चूक की बरोबर पाहायचे नसते
जसे असेल तसे स्वीकारून
आयुष्यभर ते जपायचे असते
एकदा गेलेली वेळ परतून
तुझ्यामाझ्यासाठी येतं नसते
क्षणोक्षणी उत्सव करा साजरा
जिवंतपणाची ती साक्ष असते
मिळते ज्याच्या असते नशिबात
कष्टालाही कुठे हो पर्याय असतो?
दुसऱ्याचे सुखं पाहून सुखावणे
यासारखा आंनद कशातही नसतो
"जाणीव असणे"असते निशाणी
माणूस म्हणून मिरवण्याची
संवेदनाही ठेवावी जागृत
हिच कला खरी जगण्याची
शब्द निवडावे बोलताना छान
जसा पोशाख करितो परिधान
फाटक्या तुटक्या शब्दांमुळेच
होतो ना मनामनाचा अपमान
आयुष्य फिरून येतं नसते
जगा आणि जगुद्या आनंदाने
येतं नसतो कधीच कोणी
परतून तुमच्या रडण्याने
आम्रपाली 🌹
