पाहिले जेंव्हा तुला
पाहिले जेंव्हा तुला
पाहिले जेव्हा मी तुला
उभा होतास तू दारात
डोळ्यातल्या सुखाचे कारण
आजही असणे तुझे माझ्या हृदयात
भेदरलेले मन हे माझे
रमते
बघ ना तुझ्याच आठवात
वळले पाऊल तुझे माघारी
जरी
तुझ्या हाकेचा भास या कानात
नाहीस माझ्या आयुष्यात जरी
सहवास लाभतो तुझा स्वप्नात
दोन किनारे जरी आपण
वाहत आहोत प्रेम प्रवाहात
आम्रपाली (आमु )

