सत्ता
सत्ता
काय सत्ता अन ती खुर्ची
सोबती नेणार काय
निष्ठा टांगून वेशीला
सुखनिद्रा मिळणार काय
मुखवट्याच्या आड तो
बिनधास्तपणे वावरतो
नोटांच्या जोरावरती
कठपुतळ्यांना नाचवतो
विषय सोडून विकासाचा
खेकड्यापरी खेचाखेची
वैयक्तिक मामले तुमचे
घाई चव्हाट्यावर आणायची
स्मृतिभ्रंश झालाय बहुदा
या पांढऱ्या बगळ्यांना
पूर्वजांना सोडाच हो
पण
विसरलेत आश्रयदात्यांना
नजर लागली महाराष्ट्राच्या
धुरंदर त्या राजनीतीला
लहान -मोठा,आदर सत्कार
जणू चुना लावला संस्कृतीला
राजकारणाच्या भट्टीला
गोरगरिबांचे होते सरपण
सग्यासोयऱ्याचा ढेकर अन
श्रीमतांचे आहे पोटभर जेवण
मीडिया आपली गरीबगाय
चारा मिळताच दुध देते
खरे बोलण्याची करता हिम्मत
लायसन त्यांचे गायब होते
झेंड्याझेंड्याच्या शर्यतीत
तिरंगा राहतो पाठीच आता
शपथविधीचा सोहळा
आठवून
रडते पहा भारतमाता
आम्रपाली घाडगे (आमु)
