रमाई 🌹🙏
रमाई 🌹🙏
त्यागाच्या तिच्या काय सांगाव्या व्यथा
कोंदण रमाई ज्याचे भीम कोहिनुर हिरा
प्रवाहाच्या विरुद्ध वाहणाऱ्याचा
आधार होऊन जगण्याचा
नव्हताच तिचाही संघर्ष साधा
अंधारात साहेबांची मशाल होऊन
सोबतीने चालली ती अंधारलेल्या वाटा
भीमाची सावली होऊन स्वतः तळपली
घेऊन काळजी जीवापाड लावी ममता
चंदन होऊन झिजली आयुष्यभर
खरी खुरी कस्तुरी होती रमाई माता
आजही तिचा दरवळ आहे आजूबाजूस
म्हणूनच वर्षानुवर्ष गातात रमाई गाथा
ममत्व बहाल केले, भुकेला जीवांसाठी
झाली रमा तेव्हा साऱ्यांची रमाई माता
सोन्यानाण्यांची नव्हती तिच्या आस मना
भीमरावच होते तिचा खरा दागिना...
आम्रपाली
