STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Tragedy Others

4  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Tragedy Others

मी दुर्गा बोलतेय...

मी दुर्गा बोलतेय...

1 min
563

आज माझी घटस्थापना करतील

माझ्या समोर दिव्यांची आरास सजवतील

सुरू करतील माझा जागर, नाचतील, फेर धरतील

गाणी गातील, श्रद्धेपोटी नाही! कुणा डिवचण्यासाठी


वाटते दैत्याच्या छाताडावरून उचलावा पाय, 

ठेवावा यांच्या नजरेवरच!! सगळं संपवण्यासाठी

पूजा करतील पण, नजर मात्र एका जागी स्थिरावेल

सोंग-धऱ्या भक्तांची ही गत सांगा, मला कशी पाहवेल?


हे नारी शक्ती दिसावा सकल जगी तुझा अंगार

दुर्गा-आदिशक्ती चा दाखव तुझ्यात सामावलेला झंकार

नको करूस स्वतःच्या मनाचा या हिजड्यांसाठी लिलाव

उठ, समर्थ हो, ठेचून टाक विकृतांना, कर त्यांचा पाडाव


तुही बाळगू नकोस तुझ्यात असलेल्या कलेचा अहंकार

वेळ येते तेव्हा करत जा अशा पाषानांचा यथेच्छ सत्कार

हसत हसत सकलांना मान-सन्मान आनंदाने देत जा

अंगावर कोणी आले तर मात्र, त्याला जाग्यावरच ठेचा...

 त्याला जाग्यावरच ठेचा...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy