STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational Others

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational Others

हे भारत माते वंदन तुला

हे भारत माते वंदन तुला

1 min
210

हे भारत माते वंदन तुला

सलाम जवांनाना, सलाम तिरंगाला,

तुझ्या कुशीत निपजले विर

तूच बनविले त्यांसी पराक्रमी शूर


सीमेवर लढूनी देश रक्षण करती

देशासाठी प्राण अर्पण करती

डोळे झाकता अश्रू ओघळती

नतमस्तक या माना झुकती


रानात राबतो बाप बळीराजा 

साथ तयाला देई वलीवर्द सर्जा

कुणा ना कळला हा शेतकरी राजा

पाठीवर त्याच्या सदा कर्म बोजा


देशाचा अभिमान सांगतो

हिमालयाचा गर्व पेलतो

सकळा पोटी घास भरविती

असे कृषिवल स्वराज्य घडवती


हे भारत माते वंदन तुला

सलाम जवांनाना, सलाम तिरंगाला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational