Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nanda Burkule

Tragedy

4  

Nanda Burkule

Tragedy

जगणं कसं बळ्याचं बघा

जगणं कसं बळ्याचं बघा

1 min
383


जगणं कसं बळयाचं बघा

होता पुरताच कर्जबाजारी

 आशेनच आणलं बेणं

तेही व्याज -उसनवारी .  १ 


मिरोगात आस तुझी

येशील थोडातरी

बसला दडून पाऊस

 कसा चोरट्यापरि . २


भुरभुर जरी पावसाची

गातोय राजा गाणी 

अंकुरलेल्या शेतामंधी 

डोळ्यात आणून पाणी . ३


 सपानं आशेच दिन-रात

दिसे हिरवेगार शेत

हात जोडून आणितो

 कसाबसा तो खत . ४


 डोलावत्या पिकांमधी

 फिरतोया वणवण

नाही भासणार म्हणे आता

 मला कसली चणचण . ५


 कोणा ठावं आले काय

नियतीच्या मनांत

 धो-धो वाहिला पाऊस

भरलेल्या रानांत  ६


 कुजली पार भिजून

सोयाबीन कपाशी

उपटून पडला भुईमूग

घोरत दाटला उराशी. ७


फिरलं पाणी मेहनतीवर

खचला सारा जोर

पोरा बाळाला सावरून

जाऊ कसा सामोर .  ८


 कसं फेडू मी ऋण सांगा

कोण देईल आधार

योजना सार्‍या कागदावरी

 कोण होईल उदार ?   ९


 जगणं कसं बळ्याचं बघा

पोशिंदा तो जगाचा

निराशेनं घेतो कधी

 घोट का बरं विषाचा ? १०


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy