STORYMIRROR

Anil Ghadge

Tragedy Others

4  

Anil Ghadge

Tragedy Others

शाहिदाच्या पत्नीच मनोगत

शाहिदाच्या पत्नीच मनोगत

1 min
489

घट्ट होता हात हाती

सप्तपदी चालताना

अभिमानाने भरला ऊर 

फौजीशी लग्न करताना


 दूर सीमेवर होता तैनात 

 देशसेवेची घेऊन आण 

 युद्धात आला कामी नाथ

 देशासाठी सोडले प्राण


आठवांच्या प्रचंड लाटा

उसळती माझ्या अंतर्मनात 

मी अभागन नाहत राही 

विरहाच्या अग्नि वर्षावात


 कुटुंबाच्या जबाबदारीचा

 एकटीने कसा गाडा ओढू 

 मुलांच्या भविष्याची चिंता

 करणे सांगा कशी मी सोडू 


शहिदाची मी पत्नी जरी

मन माझे ही समजून घ्यावे 

देशसेवेसाठी मला सरकारी  

नोकरीत एखाद्या रुजू करावे 

 

सैनिक माझा गौरवाने 

तिरंग्याच्या कुशीत नीजला

जपेन मीही निष्ठेने राजसा 

सैनिकाचा वारसा आपला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy