काव्यरुपी प्रेमपत्र
काव्यरुपी प्रेमपत्र
प्रिय माझ्या प्राणसख्या
मांडते पत्रात भावना
घेशील समजून मज
करते मनी मी कामना
प्रीत माझी तुजवरी
हृदयात मी रे जपली
अनोळखी नात्याची
वीण प्रेमबंधात बांधली
बोलणे तुझे हसणे ही
आठवते मज क्षणोक्षणी
दिवस-रात्र सख्या तुझी
ओढ असते माझ्या मनी
चिडवून रडवणे तुझे
अन क्षणात ते हसवणे
वेणीत गजरा मोगऱ्याचा
आठवते माझ्या ते माळणे
कस्तुरीगंधासम दरवळ
नीत्य तुझी माझ्या मनी
विरहाच्या अग्नीत जशी
रे जळत राहते ही हरणी
प्रेमवेडी तुझ्याचसाठी
भेटीस एका तरसली
भाव मनीचे सांगण्यास
लेखणी आज मी उचलली

