वेदना
वेदना


गर्द अंधाराची ही रात सरावी
चैतन्यमय एक पहाट उगवावी
परिस्थिशी जुळवणी करावी कितीदा
एक तरी हौस मनासारखी घडावी
आयुष्य माझे सारे कोंदट झाले
सुखक्षणांने त्यात दरवळ उधळावी
प्रारब्ध मजला जगणे शिकवतो
जीवनाच्या परीक्षेत पास मी व्हावी
श्वासांचे ओझे हे पेलनासे झाले
मृत्यशय्येवरी आता झोप काढावी
पापणीत होती स्वप्नं दंड्वलेली
एक एक स्वतःहुन अश्रूंतून वाहावी