STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Tragedy

3  

Vishweshwar Kabade

Tragedy

हाहाकार

हाहाकार

1 min
183

असा कसा आणलास देवा तू महापूर

सगळीकडे उडवलास हाहाकार

केलास अतिवृष्टी

बिघडवलास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची सृष्टी

बिघडली वाटते तुझी दृष्टी

पाण्याखाली गेलेेे तुझे सुद्धा निवास

नको ढळू देऊ फक्त आमचा तुझ्यावरचा विश्वास

मग नाही उरणार तुझ्याप्रती आस

नको हिसकावू उगाच तोंडचा आमचा घास

मग आम्ही ठरवू तू फक्त एक भास

आम्हालाच दाखवावे लागेल येथे साहस

का केलास महाड दुर्घटनेत निष्पाप जीवांचा अंत?

नाही कशी वाटली तुुज खंत

असा कसा झालास तू संत

तुझे रूपे का नाही दाखवली अनंत?

का नाही दिला ऐनवेळी हात?

का बसला आमची दैना पहात?

का झालास तू पाषाण?

विसरुनी आपलं भान

आता होत नाही हेे सहन

भरून आलंय हे मन

नको मज धन

पण फक्त संभाळ आमचं तन

बंद करुनी हे पुराचं थैमान



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy