STORYMIRROR

VINAYAK PATIL

Tragedy

3  

VINAYAK PATIL

Tragedy

काळी माती

काळी माती

1 min
578

तुझ्या या काळ्या मातीत

किती कसावं कसावं

न देई दाणा म्हणून

कसं रुसावं रुसावं ||१||


ढगांना न येई राग

कसा पिकल कापूस

माझ्या देही होई आग

ढग देईना टिपूस ||२||


माझी तिफण शेतात 

किती जोमात जोमानं 

वाफलं ना शेती पीक

किती रडावं रडावं ||३||


माझ्या हातूनी कसती

किती घामानं भिजावं

पिकल ना दानं इथे

कसं उपाशी निजावं ||४||


तुला येऊ दे गं राग

शिवार घामानं फुले

रास बघून धान्याची 

माझं लेकरू हसले ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy