खूप काही
खूप काही
खूप काही सांगून जातात.
त्या आठवणी परत का येतात.
कशाचाच कशाला नवहता मेळ,
का उगा पुन्हा नवी ओळख देऊन जातात.
बरे होते आपण अनोळखी होतो,
उगाच नात्याची फरफट करत होतो.
कोणाला कसलेच घेणं देणं नवहत.
स्वहताच्या कक्षेत बंदिस्त होतो.
नावाच्या कोंदणात नात्याला बसवलं.
ओढून ताणून कुठवर ते जपलं?
तुझं अवकाश वेगळं माझं अस्तित्व वेगळं.
एकाच पाशात जखडून आयुष्य बनल खेळणं.
किती ही नाही म्हंटलं तरी आठवणी येत राहतात.
एकदा त्यात मन रमल तर माघारी त्या जायला विसरतात.
खूप काही सांगून जातात तुझ्या माझ्या आठवणी.
कधीच कोणी लिहिली नसेल अशी अनोखी कहाणी.

