STORYMIRROR

Anil Ghadge

Romance

4  

Anil Ghadge

Romance

तुझी भेट

तुझी भेट

1 min
406

जीवनाच्या वळणावर 

अवचित भेटलास

पाहता क्षणी तुला 

आपलासा वाटलासं 


 नजरेस मिळता नजर

 प्रीतकळी उमलली

 मधाळ तुझ्या शब्दांनी

 हृदयी प्रीत जागवली


 अनोळखी नात्याचे

 वलय क्षणात विरले

 हृदयातील कोंदणात

 एकमेकास कोरले


 कोसो दूर अंतर जरी

 असे तुझ्या माझ्यात

 माझ्या तू तुझ्या मी

 आहोत प्रत्येक श्वासात


 रेशीम बंध प्रीतीचे

 आले जुळुनी जन्माचे

 हृदयाच्या ठोक्यात

 नवा फक्त सख्याचे


 समंजसपणे वागणे 

 रीत आपल्या प्रेमाची

 आदर एकमेकांप्रती

 सीमा राखू संयमाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance