नवा जन्म
नवा जन्म


त्या दिवशी दुपारी चार वाजता अचानक अंजलीच्या पोटामध्ये जोरात कळ उठली पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे तिला चक्कर आली म्हणून अंजली बेडवर तशीच पडून राहिली.... थोड्या वेळातच तिला खूप हेवी ब्लीडींग पण सुरू झाली. चक्कर थोडी कमी झाली, थोडसं बरं वाटलं काहीच लक्षात येईना हे असं नेमक अचानक काय झाले पण अंजली ने सावरले स्वतःला.तिने तिच्या पतीला(दिनेश)कॉल केला पण नेमका त्यावेळी त्यांचा फोन लागेना.
मुंबई मध्ये स्थित अंजलीच छोटस कुटुंब घरात ती , मिस्टर आणि एक मुलगी ती शाळेत गेलेली होती आणि घरात अंजली एकटीच होती. आणि तेवढ्यात मुली ला शाळेतून आणायची वेळ झाली ,पण तरीही थोडी हिंमत केली तिने आईची माया (हिरकणी) जागी झाली, त्या वेदना विसरून ती मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेली. कारण शाळेतल्या नियमानुसार फक्त मुलांच्या पालकांनी मुलांना शाळेत आणण्यासाठी जावे लागत असे. म्हणून, अंजली तशीच शक्ती एकवटून उठली व मुलीला शाळेतून घेऊन आली.चक्कर सोडली तर बाकी त्रास सुरूच होता तिला.अंजली परत बेडवर येऊन आराम करत पडली. तीला वाटले त्रास कमी होईल म्हणून ती तो त्रास अंगावर काढत बसली. दिनेश कॉलेज मध्ये लेक्चरर होते. त्यादिवशी दिनेशलाही कॉलेजमधून परतायला थोडा वेळ झाला. तोपर्यंत चांगले आठ वाजले होते, दिनेश घरी आल्यानंतर तिने तिच्या होत असलेल्या त्रासाबद्दल त्याला सांगितले, दिनेशने लगेच त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना(डॉ. दास) फोन केला,डॉक्टर क्लिनिक बंद करून नुकतेच त्यांच्या घरी पोहंचले होते,म्हणून एक टॅबलेट लिहून व्हाट्सअप ला सेंड केली आणि ही टॅबलेट घेऊन अराम करा आणि सकाळी लवकर च क्लिनिक ला यायला असं सांगितले.औषध(पेनकिलर)घेऊन त्या रात्री ती झोपी गेली तशी तिला झोपही लागली. सकाळी उठली पण तोच त्रास परत तिला होऊ लागला.तशी अंजली व दिनेश दोघेच मुलीला शेजारच्या काकूंकडे ठेवून दवाखान्यात गेले.डॉक्टरांनी अंजलीला तपासून ताबडतोब सोनोग्राफी करायला सांगितली.लगेच जवळच असलेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये ते दोघे पोहंचले आणि नशीब चांगल म्हणून अंजलीला तिथे अपॉइंटमेंट ही मिळाली, कारण त्या डॉक्टर ला अर्जंट दुसरीकडे काही इम्पॉर्टन्ट काम असल्याकारणाने बाहेर जायचे होते पण डॉ.दास ने सोनोग्राफी सेंटर मध्ये तिथल्या रेडिओलॉजिस्ट यांना फोन करून अर्जंट सोनोग्राफी आहे कृपया तेवढी सोनोग्राफी करा असं अगोदरच सांगितले होते.अंजलीची अल्ट्रासाउंड सोनोग्राफी केली तसेच एक प्रेग्नंसी टेस्ट केली तर त्यात असे निष्पन्न झाले की तिला एकटोपीक प्रेग्नसी आहे.पण...
रेडिओलॉजी डॉक्टरानीं अंजली ला त्यांच्या केबिन मधून बाहेर जाऊन अराम करा म्हणून सांगून दिनेश शी महत्वाचे बोलायचे आहे म्हणून तिथेच त्याला बसवून घेतले.तशी अंजली केबिनच्या बाहेर येऊन बसली आणि डॉक्टरानीं दिनेश ला सोनोग्राफी मध्ये जे दिसलें त्याबद्दल जे सांगितले ते ऐकून तर दिनेशच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या डोळ्यात पाणी आले "फक्त दोन तीन तास" तो फक्त एवढंच बोलला.. अंजलिच्या जीवास धोका.. फक्त दोन तीन तासच..., शक्यच नाही असं कसं होऊ शकत डॉक्टर.., असं स्वतः शीच बोलत दिनेश रडत होता. त्याला हे ऐकूनच धक्का बसला होता. पण त्या सोनोग्राफी डॉक्टरानी दिनेशला सर्व व्यस्थित समजावून सांगितले, की हे पहा mr. दिनेश "तुमच्या पत्नीच्या एकटोपीक प्रेग्नसीमुळे गर्भ गर्भनलिकेमध्येच आहे आणि तिथेच गर्भाची वाढ होत असल्यामुळे गर्भनलिका डॅमेज झाली आहे आणि त्यामुळे आंतरिक रक्तस्त्राव वाढत चालला आहे आणि याचाच धोका तुमच्या पत्नीच्या जीवाला आहे" त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या कमीत कमी वेळेत,जवळपास असलेल्या एखादा चांगल्या हॉस्पिटल मध्ये भरती होऊन ऑपरेशन करावे लागेल तरच त्या वाचतील, याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. गर्भनलिका फुटल्यामुळे रक्तस्त्राव वाढत चाललेला आहे, आणी पॉइझन होऊन शरीरामध्ये ते पसरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एकही मिनिट वाया घालवू नका योग्य तो निर्णय घ्या.
"आणि तुमच्या पत्नीला हे शक्यतो सांगू नका त्या घ
ाबरतील आणि पुढचे कॉम्प्लिकेशन वाढतील कारण ह्या अवस्थेतील पेशंट शक्यतो बेशुद्ध अवस्थेत असतो पण तुमच्या पत्नीची जगण्याची दृढशक्ती दिसत आहे म्हणून आणखी तरी चालत फिरत आहेत."
दिनेशला आता काहीच सुचत नव्हते फक्त चांगल्या सर्जन वेळेला भेटणे आवश्यक होते. तो सोनोग्राफी डॉक्टरांच्या कॅबिन बाहेर आला. तिला धीर देत म्हणाला "हे बघ अंजली काहि जास्त प्रॉब्लेम नाहीये फक्त एक छोटस ऑपरेशन सांगितले आहे डॉक्टरानीं ते तेवढं लगेचच अर्जंट करावे लागेल" पण तो आतून रडत होता....अंजली व दिनेश त्यांच्या फॅमिली डॉक्टराकडे सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन आले.डॉ.दास त्यांना लगेच एका मोठया हॉस्पिटलच्या सर्जन डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन दिली आणि त्या सर्जनने फोनवरच ऑपरेशन चा खर्च *एक लाख* इतका येईल हे आवर्जून डॉ.दास यांना सांगितले.मुंबई सारख्या ठिकाणी डॉक्टर पैसे भरल्याशिवाय कुठल्याही पेशेंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेत नाहीत.हे आपल्याला माहितीच आहे.
आणि नेमक्या त्याचवर्षी नोटबंदी चे तुफान आलेले होते.आणि दिनेश चे पैसे बँक खात्यात जमा होते आणि जरी ATM मशीन मधून काढायचे म्हटले तरी नियमानुसार एकदिवसाला फक्त दहा हजारच काढता येत होते.त्यामुळे त्याची बुद्धी सुन्न झाली होती इकडे अंजलीचे अवसान ही गळून चालले होते तिचा त्रास वाढत होता आणि दिनेशला तिची तीच अवस्था बघवत नव्हती.असे काही अचानकच होईल हे त्याला स्वप्नात पण वाटले नव्हते पण आल्या परिस्थितीला तोंड द्यावेच लागणार होते.एकतर अंजली आणि दिनेश चे मुंबई मध्ये कोणीच जवळचे असे नातेवाईक ही नव्हते तशी एका मित्राकडे पैश्याची त्याने मागणी केलीही पण तो नेमका त्याचवेळी त्याच्या गावी गेलेला होता.
सर्वसामान्य माणसच्या घरात असे लाखो रूपये कधीही हजर नसतात. एका पगारीतच त्याला सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतात त्यात मुंबई सारख्या ठिकाणी तर अमाप खर्च असतो. दिनेशला आतातर काहिच कळेना काय करावे पण डॉ.दास खरंच देवमाणूस होते त्यांनी स्वतः त्या सर्जनशी फोन करून त्यांना सर्व अडचण सांगितली.आणि अंजली, दिनेश आणि त्यांचे डॉ.दास स्वतः सर्व मिळून त्या हॉस्पिटल मध्ये गेले.त्या दिवशी डॉ.दास चे कलकत्ता जाण्यासाठी फ्लाईट होते ते सुद्धा त्यांनी कॅन्सल केले. केवळ फक्त एक पेशंट साठी... बाकी रक्ताचे नाते, ना जात ना पात काहीच एकमेकांशी संबंध नव्हता त्यांचा व दिनेश अंजलीचा.फक्त माणुसकी बस एवढाच.
अश्यात एव्हना एकदिड तास निघून गेला होता..सर्जरी करणारे डॉक्टर त्यांच्या घरून तर निघाले होते पण ट्रॅफिक मध्ये अडकल्या मुळे त्यांना यायला आणखी थोडा वेळ लागनार होताच.तो पर्यँत नर्स, ज्यूनीयर डॉक्टर यांनी ऑपरेशन च्या इतर गोष्टीची फॉर्मलिटी करून घेतली होती. शेवटी एकदाचे सर्जन हॉस्पिटल मध्ये आले.
डॉ. दास अक्षरशः त्या सर्जन डॉक्टरांच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि त्यांना म्हटले"हे बघा ह्या पेशंट माझ्या बहिणीसारख्या आहेत त्यामुळे अगोदर ऑपरेशन करा आणि त्यांचा जीव वाचवा. दिनेश एक चांगली व्यक्ती आहे मी त्यांना चांगले ओळखतॊ ते पैश्याची काही तरी सोय नक्की करतील".आणि तो क्षण खरंच अविस्मरणीय होता,सगळेच भावुक झाले होते दिनेश तर रडत होताच पण डॉ.दास चे ही डोळे पाणावले होते, आणि मुंबई मध्ये अशी माणुसकी पहायला मिळणे खुप दुर्मिळच आहे.सर्जन ने लगेच होकार दर्शवला
आणि अंजलीला ऑपरेशन थिएटर ऑपरेशन साठी घेतले, दिनेश आणि डॉ.दास तिथंच ऑपरेशन रूमच्या बाहेर रिसेप्शन मध्ये बसून राहिले.एका तासात ऑपरेशन झाले, अंजलीला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केले, जोपर्यंत तिची भूल उतरून ती बोलायला प्रतिसाद देऊ लागली तोपर्यंत डॉ.दास ही तिथेच थांबले होते.
आणि डॉ. दास यांचेमुळे अंजलीचे प्राण वाचले होते. आजन्म असे त्यांचे ऋण अंजली आणि दिनेश वर राहतील.दिनेश ने पण पैसे जमा करून हॉस्पिटल मध्ये जमा करून टाकले.
आजच्या युगात रक्तताच्या नात्या पेक्षा परके नाते जास्त जवळचे वाटत आहेत.
( ही सत्यकथा माझी स्वतः ची आहे. पात्रातील अंजली म्हणजे मी स्वतः आहे..)