STORYMIRROR

Anil Ghadge

Others

4  

Anil Ghadge

Others

स्वातंत्र्यगी

स्वातंत्र्यगी

1 min
214

श्वास झाले मोकळे आज

तुटले साखळदंड पायातील

स्वातंत्र्याची उगवली पहाट

सरली रात्र पारतंत्र्यातील


गुलाम बनवून भारतीयांना

चोर ते चोर केली शिरजोरी

इंग्रजांनी हालहाल करुनी

अमानुषपणे केली अत्याचारी


क्रांतिवीर अन् देशप्रेमी

लढले जीवाचे करुनी रान

थेंब थेंब रक्ताचा सांडून 

स्वातंत्र्यासाठी सोडले प्राण


बलिदान देऊन वीरांनी

पदर सावरला मातेचा

हुतात्मा झाले वीर अनेक

 स्वीकार करुनी फासाचा


जाणीव ठेवून बलिदानाची

एकजुटीचा निश्चय करू

जाती धर्म भेद विसरून

तिरंगा ध्वज हाती धरू


प्रगतीपथावर ठेवू पाऊल

हात घेऊनी हातात

भारत माता की जय बोलू

अभिमानास्पद थाटात


Rate this content
Log in