प्रतीक्षा बळीराजाची
प्रतीक्षा बळीराजाची
काव्यप्रकार षडाक्षरी
मन चिंताक्रांत
शिवार तापलं
भेगाळली भुई
कवा गंधाळलं?
वृक्षतोड केली
ऱ्हास जंगलांचा
ईरा झाकोळली
दोष मानवाचा
नजर आभाळी
नक्षत्रे कोरडी
विहीरी आटल्या
पिके हो उघडी
कर्ज पिकापायी
काही उमजेना
पीक उगवेना
काहीच सुचेना
एक मार्ग दिसे
मला सुटण्याचा
फासाने सुटेल
प्रश्न आयुष्याचा
गुरे भुकेलेली
पोरंही उदास
अशामधी कसा
वेढू सांगा फास?
जगणे-मरणे
अवघड झाले
कर वर्षाव रे
प्राण कंठी आले
