कोरोनायोद्धा-डाॅक्टर
कोरोनायोद्धा-डाॅक्टर
देव नसूनही देवासारखे
सतत तुम्ही धावून येता
बनून अनेकांचे प्राणदूत
तुम्हीच तर खरे देवदूत बनता....
कोणास ठाऊक कसे केव्हा
कोरोनाचे संकट उद्भवले
तुमच्या रूपाने पृथ्वीवर मात्र
देवच जणू अवतरले....
महामारीच्या या संकंटासमोर जेव्हा
प्रत्येक माणूस हतबल झाला
जन्म मरणाच्या उंबरठ्यावर मात्र
हा डॉक्टर खंबीरपणे उभा राहिला
एक नाही दोन नाही आजही
लाखो जीव कोरोनाशी लढत आहेत
त्यांना जीवदान देताना मात्र आमचे डाॅक्टर पावलोपावली मरत आहेत...
तसा जन्मा-मरणाचाच खेळ हो सारा
तो कोणालाही चुकणार नाही
प्रसंगी अपमान सहन करून सुद्धा तुम्ही तुमचे प्रयत्न सोडले नाहीत....
खरंच, खरंच कसे मानावे आभार तुमचे
सारे जग हे तुमच्या कर्जात आहे
झिजवलं ज्यांनी त्यांच आयुष्य समाजासाठी
अशा या डाॅक्टरांचा आम्हाला अभिमान आहे
