STORYMIRROR

Shraddha Kalyankar

Others

3  

Shraddha Kalyankar

Others

माणूस म्हणून जगताना.. ❤

माणूस म्हणून जगताना.. ❤

1 min
228

माणूस म्हणून जगताना

माणुसकीला वाव द्यावा

माणसातील माणसाला 

थोडा तरी भाव द्यावा...


दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी

परिस्थितीचा विचार करावा

स्वतःला त्या जागी ठेवून 

मग काय तो निर्णय घ्यावा

माणसातील माणसाला 

थोडा तरी भाव द्यावा...

 

नि:स्वार्थीपणे मदत करावी

नकोत मनात कसले डाव-पेच 

चुकलेल्यांनाही माफ करावे

माणूसकीचे लक्षण तेच 

रहावे मन निर्मळ नेहमी

सत्याचाच एक ध्यास घ्यावा 

माणसातील माणसाला

थोडा तरी भाव द्यावा....

 

माणूस म्हणून जगताना 

विचार करावा दुसऱ्यांचा 

राग,द्वेष बाजूला सारून

मार्ग धरावा प्रेमाचा 

स्वतः सारख्याच दुसऱ्यांनाही 

थोड्याफार भावना असतात 

नकळत जरी दुखावल्या तरी 

असह्य अशा वेदना होतात

आनंदाचा वर्षाव करून

समाधानाचा श्वास घ्यावा

माणसातील माणसाला

थोडा तरी भाव द्यावा....  

    


Rate this content
Log in