STORYMIRROR

Shraddha Kalyankar

Inspirational

3  

Shraddha Kalyankar

Inspirational

आयुष्य सुंदरच आहे...

आयुष्य सुंदरच आहे...

1 min
236

आयुष्य सुंदरच आहे

फक्त ते जगता आलं पाहिजे

जगण्यामधलं गोड सौंदर्य

आपल्याला फक्त जपता आलं पाहिजे... 

सुरूच असतं सुख-दुःखाच चक्र

फक्त त्यात स्वत:ला सावरता आलं पाहिजे

कुठे थांबायचं नि कुठे चालत राहायचं 

हे फक्त वेळच्यावेळी ठरवता आलं पाहिजे

आयुष्य सुंदरच आहे

फक्त ते जगता आलं पाहिजे.... 

मनाविरुद्धच्या गोष्टींनाही कधी कधी 

सत्य मानून स्वीकारता आलं पाहिजे

भूतकाळाला अचुक टिपून 

भविष्याला सुखद रंगवता आलं पाहिजे

आयुष्य सुंदरच आहे

फक्त ते जगता आलं पाहिजे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational