आयुष्य....❤
आयुष्य....❤
1 min
348
किती क्षणांच आयुष्य असतं?
आज असतं उद्या नसतं
म्हणूनच प्रत्येक क्षण इथं
आनंदाने जगायचं असतं..
होतीलच गोष्टी मनासारख्या
असं दरवेळी घडत नसतं
बदलणाऱ्या जगासोबत थोडसं
आपणही बदलायचं असतं
प्रत्येक क्षण इथं
आनंदाने जगायचं असतं..
सुख वेचायला गेल की
दु:ख ही आयुष्यात येत असतं
दु:खातून सावरलं की
सुखाचा क्षण डोकावत असतं
दु:खाला तिथेच सोडून
सूखासोबत चालायचं असतं
प्रत्येक क्षण इथं
आनंदाने जगायचं असतं..
सुटतो काहीजणांचा हात नकळत
म्हणून धरलेला हात सोडायचं नसतं
एक फूल उमललं नाही म्हणून,
रोपालाच कधी तोडायचं नसतं
चुकलेल्यांनाही माफ करून
स्वतः समाधानी व्हायचं असतं
प्रत्येक क्षण इथं
आनंदाने जगायचं असतं..
