STORYMIRROR

Shraddha Kalyankar

Tragedy

4  

Shraddha Kalyankar

Tragedy

कोरोनायुग....

कोरोनायुग....

1 min
616

बदलून गेले माणसाचे वागणे असे, की कोरोनायुग आले

जवळीक होती पूर्वी नात्यात आता फक्त दुरावे उरले.. 

काय माहिती, कशी, केव्हा या युगाची सुरूवात झाली

एकाच घरात राहून माणसांना दूर दूर राहण्याची वेळ आली

एक दोन म्हणता म्हणता लाखापर्यंत संख्या पोहोचल्या... 

हाॅस्पिटल मध्ये जागा नाहीत अन् मृत्यूने तर तांडव केला... 

अदृश्य अशा या व्हायरस समोर बुद्धिमान माणूस हतबल होतोय

चंद्रा-मंगळापर्यंत जाणारा,आज मात्र प्राणवायूसाठी भटकतोय.... 

सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटाइजर यातच जीवन गुरफटून गेलंय

आकाशात उंच झेप घेण्याचं स्वप्न मात्र

घरात बंदिस्त होऊन पडलंय.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy