# मदत
# मदत
जो तो आपल्या मालक मर्जीचा
असतो चालक खऱ्या आयुष्याचा
दुसऱ्याचे चांगले व्हावेसे वाटते
त्यातले थोडे से आपल्याकडे येते
परोपकार नेहमी करावा मनापासून
तरी ठेवावं थोडं हातच राखून
माणुसकी जपणारी माणसं जरूर भेटतात
नकळत मनाचा ठाव घेऊन जातात
गरजेपुरतीच नेहमी करावी मदत
नाहीतर येऊ शकते ती अंगलट.
प्रा.सौ. नलिनी लावरे
