STORYMIRROR

Suhas Bokare

Romance Tragedy

4  

Suhas Bokare

Romance Tragedy

दोन गझला

दोन गझला

1 min
255

दोन परस्पर संबंधित गझला, दोन्ही मधे काफिया एकच.


१.तो म्हणतो...


मूर्ती जुनी झाली अता 

जागा सुनी झाली अता 


फिर्याद का दुःखी तुझी 

हास्यातुनी झाली अता ...


फाल्गुन हा कोरा फिका 

सय फाल्गुनी झाली अता 


शैली तुझी होती खुळी ...

योगी मुनी झाली अता!


माझी मती त्राग्यामुळे ...

क्रोधी शुनी झाली अता 


थंडावला तो गारठा ...

थंडी उनी झाली अता 


यज्ञात ह्या प्रेमा तुझ्या 

माझी धुनी झाली अता


-------------------------------------

२. ती सांगते...


पैंजण जुनी शृंगारते 

मैफिल सुनी शृंगारते


डोळ्यातली जादूगिरी 

हास्यातुनी शृंगारते...


संपायच्या मार्गातला 

पट फाल्गुनी शृंगारते


प्रज्ञा मनी डोकावते 

योगी मुनी शृंगारते


भोळी सखी माझी भिती ...

दारी शुनी शृंगारते


सोडावया गुंता सुई ...

धागे उनी शृंगारते


धीमेच मी संपायला 

माझी धुनी शृंगारते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance