हरवलेली आपुलकी 🙏
हरवलेली आपुलकी 🙏
गरीब आणि श्रीमंतांना
लागलाय स्मार्टफोनचा लळा....
प्रगती होत नाही म्हणून
काढताय का गळा....?
बहिण भावाचे समक्ष
काही बोलेना..
मोबाईल मध्ये मेसेजला
जागा काही पुरेना...
हृदयातील जागा होते कमी..
मात्र मेमरी कार्ड यांचे 64जीबी..
मंदिरातील प्रदक्षिणा
घालायची प्रथा बंद झाली...
टेंपलच्या गेममुळे
पळापळीची सवय लागली...
माणुसच माणसांच्या
गर्दीत एकटा होऊन गेला...
सेल्फी काढताना
स्वतःबरोबर दुसऱ्याचा ही
जीव घेऊ लागला...
राहिला नाही कोण कुणाचा
बोथट झाल्या संवेदना...
आनंदासाठी असो वा ही
दुःखद श्रद्धांजली साठी दोन
रडक्या इमोजी हात
जोडतात पुन्हापुन्हा...
डीपीच्या लाईक अन् टेस्टच्या
जाहिरातीत आपण सारेजण
गमावलो आहोत...
हरवलेली आपुलकी
माणसांच्या गर्दीत ...
