आई❣️.
आई❣️.
एकाच नाण्याच्या दोन बाजू आई आणि देव,
परमेश्वराने दिली सगळ्यांना बिनव्याजी ठेव....
आई असते म्हणून ,आहे घराला घरपण
तिच्या ओंजळीतील माया
मुलांसाठी करते ते अर्पण. ...
माता कुराणातलीअसो वा पुराणातली, दिगंबरा ची असो वा पैगंबराची,
रामची असो वा शामची,
रक्तातली नसो व नाळेची असो,
आईच श्रेष्ठ असते कोणतेही नात्यातली...
अमृतकुंभ असते आई,
तानुल्यासाठी रात्रंदिवस गाते अंगाई...
बोल तिचे चंदनासम मोलाचे,
पण मोल ना त्या वाणीचे ...
रागावली तर कधी तापलेल्या लोहा परी, समजावते कधी शितल चांदण्या परी...
सागरासारखे वासल्य तुझे, आभाळा सारखी माया मिळते क्षणोक्षणी जगता,
शून्य बॅलन्स वापरत उधळलेले
अनमोल तुझी ममता....
डोळे भरून पाहणारी, तुमची आठवण काढणारी, ऊन ऊन दोन घास वाढणारी तीअन्नपूर्णा माता..
,
नवऱ्यासाठी सुद्धा असते ती
क्षणाची पत्नी आयुष्यभराची माता...
तीचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षाही भारी,
थेट बीजांडातून ब्रह्मांडात पोहोचवणारी अवकाश गंगा माझी आई...
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुक,
ही फक्त श्रीमंतीची कागदं नात्यात .
आईच कर्ज फेडण्यासाठी इतकं
कुठे आहे बॅलन्स त्यात......?
या कर्जातून मुक्त होण्याचा
एकच मार्ग एकच उतराई......
जेव्हा बनाल तुम्ही एका .....
पिल्लाचीआई
