शोधत आहे
शोधत आहे
शोधले की सापडतं .....
विज्ञान आलं...
तंत्रज्ञान आलं...
शोध लागले...
पण जे आपले,
तेच हरवले...
जे काही हरवलं ते शोधत आहे....
मैदानातील मुलं...
मुलांमधील बालपण...
जीवनातील समर्पण...
काचेतील दर्पण...
ढगाळेला श्रावण...
तरुणपणातील यौवन...
स्वतःतील कार्यक्षमता
शोधत आहे...
अतिथीं देवा समान
माणुसकीचा सन्मान
शेजाऱ्यांची पहचान
रसिकांचे कान
सरस्वतीची वाणी शोधत आहे ....
डोळ्यातील पाणी...
आजीची कहाणी...
संतांची वाणी...
कर्णासारखा दानी....
प्रेमाचे दोन क्षण
पाण्याचे औक्षण
लग्नातील सनई
खऱ्यातील सच्चाई
खोट्यातील अच्छाई
गरिबांची होळी
अंगणातील रांगोळी
रेखाटलेली शोधत आहे....
झाडांबरोबर गाणारा खेडेगाव
लक्ष्मणासारखा भाव
बायकांचा पानोठा
गाईचा गोठा
ओझं पेलणारे वांदे
शेवटचे लागणारे चौघांचे खांदे
सुधारित आवृत्ती
परोपकारी वृत्ती... शोधत आहे...
