मला मोकळं जगता येईल का?
मला मोकळं जगता येईल का?
घे उसासा श्वासांचा
नव्या तुझ्या उमेदीचा
व्यक्त होऊन बघ जरा...
तुझ्यात आहे, आनंदी
खळखळणारा झरा...
गप्प नको तू राहू तू ...
थोडं तरी बोलून बघ. ...
अगदी दिलखुलास मनसोक्त
तुझ्यासाठी मोकळत जगून बघ.
किती वेळ डबक्यात
साचूनी बसशील गं...
तुझ्यासाठी कधीतरी,
तुझ्यासाठीचा एल्गार तू
करून चळवळ तारशील गं ...
या सगळ्याच कलकलाटात
आवाज तुझा सांडशील गं...
जरा मोकळं,आनंदी जगून बघशील गं....!का?
