STORYMIRROR

Swati Jangam

Romance

3  

Swati Jangam

Romance

हरित तृणावर

हरित तृणावर

1 min
112

मखमलीच्या हरित तृणावर

 गीत माझे विस्कटले...

हृदय रिकामे असताना 

पावलांनी सावरले...!


मुक्या भावनांचा भार मनावर 

चमकते यातना तुझ्या स्वरावर

 पाय शोधतात ती सावली

 आठवणींच्या हिंदोळ्यावर...!


गर्द निळी छाया नभाची

मनाच्या कवडशातून झळकते

मळभ किरणांचे आले त्यावर 

हृदय अधीर कळवळते...!


भ्रमर मनाचा क्षणा -क्षणाने...

तना-तनाने थकला,

ही वाटच वेडी शिणली 

 हे काव्य तुझसाठी विखुरले

 या मखमालीच्या हरीतृणावर 

गीत माझे विस्कटले...

हृदय रिकामे असतानाही 

पावलांनी सावरले....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance