काव्य शिल्प
काव्य शिल्प
अंतर्मनाच्या गाभाऱ्यात
लेणी खोदलेली...
अनेक सुगंधी आठवणीची,
काव्य शिल्प मूर्ती होऊन राहिले..
शिल्प हे शिल्पच राहतात...
काव्य मनाच्या आनंदाचं, जगण्याचं,
अस्तित्वाचं लेणं बनून जातात...
शिल्पातलं मूर्त रूप काव्याचं प्रतिक
होऊन निरंतर जिवंत राहतात...
