STORYMIRROR

Swati Jangam

Tragedy

3  

Swati Jangam

Tragedy

घुसमट

घुसमट

1 min
172

का तुला लाभली

इथली अभेद्य चौकट... 

रोजच सलत आहे  

भाळी प्रतिभेचा मळवट...

स्वैर बिचारा मानसपक्षी 

मुक्त विहारण्यास होते घुसमट


 रंग उभारले...

 कौलाच्या कवडशातून 

दिसले ते धुसर धुरकट


लसलसणाऱ्या जखमांचे 

दाह आहेत कोमल तापट


 शेवटी ओळखलीस 

तू अस्पष्ट दिशा 

आर्त हाक घालते 

अनामिक सुरावट


जाणलीस बाई,

मनातल्या हुंकाराला साद देताच 

नाद अनाहत...

 दूर झाले आता जाळ्याचे जळमट...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy