चतुर्थी
चतुर्थी
डियर डायरी...
उपवासाची नाही
कोरोनाची आहे
मेल्याला उपाशी ठेऊन
मारायचं आहे
बरेच दिवस मेला
लोकं मारतो आहे
आपल्याला घरात कोंडून
स्वतः मस्त बाहेर फिरतो आहे
आमच्या तोंडचं पाणी पळवून
स्वतः मस्त समुद्रात डुंबतो आहे
खिडकीतून मी हे हे सगळं पाहते आहे
थांब तुझं नाव पोलीस काकांनाच सांगते
तुलापण बांबूने मारायला लावते
नाहीतर डॉक्टर काकांना बोलावून
टुचुक करायला भाग पाडते
आम्हाला सगळ्यांना घरात बसवणाऱ्या
तुला आता आठवले काकांकडेच पाठवते
त्यांच्या शीघ्र कविता ऐकवते
आणि तरीही नाही घाबरलास तर
गो कोरोना गो म्हणते
पण मी मात्र घरातच बसते
तुझी अना (आज लहानपणीची)
