हिरवळ....
हिरवळ....
1 min
240
शुष्कता सोसते हिरवळीचा भार
पायी तिच्या रान सारं
डोई मोकळं आभाळ
पर्णहीन प्राण तिचा
शोधतो पाऊसही सखा
वाट तिची अनघड
गोंदण मात्र उजाड
येतात सगळेच तिच्या नशिबी
जातात निघून आपापल्या वाटा
ती मात्र शोधात अजूनही त्याच्याच
आता कळतात तिला माणसं, पक्षी, प्राणी आणि निसर्गही
प्रत्येकाची वेगळी लहर
भाव भावनांचा वेगळाच कहर
पण ती रडत नाही
जगून घेते सारं आता
आणि हसून स्वागत करते
निळ्या आकाशाचंही आता...
