कधी काही झालंच तर...
कधी काही झालंच तर...


प्रिय डायरी
(हे त्याच्यासाठी ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करते आहे गेली अनेक वर्ष)
असं वाटतं कधी कधी झालंच आपल्याला काही
तर तेव्हा तू आणि मी कुठे असू?
शेवटचं बोलून, भेटून, बघून
मग श्वास सोडता येईल आपल्याला?
की
फक्त उरलेल्या श्वासात तुला हाक मारून
मनापासून तुझ्यापर्यंत पोहचून शरीराने पृथ्वीच्या पोटात
आणि मनाने तुझ्यात विलीन होता येईल कायमचं...
तुझीच
अना