गंध अनंताचा
गंध अनंताचा
1 min
343
गंध अनंताचा दरवळला
अनंतात विलीन होऊनी
तुझ्या पायाशी विसावला
तुला वाहूनही
तो चहूकडे परिमळला
गंधित शुभ्ररंगी नाहला
त्याच्या सुगंधाचा का इतका ध्यास
तबकात सगळ्यांची एकच रास
मग वेगळेपणाची
ही कोणतीआस
पहाटे पाहुनी अनंताला सहजच विचार मनी आला
झाडावरचा सुगंध त्याने हुडला
आणि सुगंधाचा धनी देव झाला
