तिसरा तिसऱ्याचा
तिसरा तिसऱ्याचा
1 min
193
जागा फक्त बदलत राहतात
एकाची दुसरा
दुसऱ्याची तिसरा
पण पहिल्याची सर ना दुसऱ्याला येते
नाही तिसऱ्याला
आणि मग कितीही कोणासाठी करा
कमीच वाटायला लागतं
अपेक्षा न ठेवता केलं
तरीही समोरच्याचं टोचून बोलणं
जास्त लागतं
मग प्रश्न पडायला लागतो
माणूस म्हणून आपण नेमकं काय जगतो?
आणि उगाच निसर्गाशी स्वतःला जोडतो?
इतकं सगळं फिरून आल्यावर मात्र
गप्प हातात झाडू घेतो...
