तिसरा तिसऱ्याचा
तिसरा तिसऱ्याचा
जागा घ्यायला खूप मोठी रांग असते
एकाची दुसऱ्याशी तुलना
करण्यासाठी सुद्धा
पण मुद्दा असा आहे की
एकाची जागा ना दुसरा घेऊ शकत
ना दुसऱ्याची तिसरा
कितीही कोणासाठी केलं
तरी माणूस पुरेनाच
तुलना आणि तू काय केलंस?
हे प्रश्न हमखास ठरलेले
मग अशा वेळेला उगाच निसर्गाशी जोडतो
इकडे तिकडे पाहतो
स्वतःच्या अस्तित्वाची दखल घेतो
आतल्या आतच फक्त पेटून उठतो
आणि गप्प हातात झाडू घेतो
आणि घर साफ करायचं आहे
या आरोळीने दचकून
साफ करायला लागतो...
