मला कळतच नाही
मला कळतच नाही


मला ना आजकाल कळतच नाही
मी बदलले आहे
की हवामान
चहा जास्त गरम आहे
की माझा राग
प्रेम जास्त आहे की
तो माणूसच जास्त गोड
काम जास्त आहे की
स्ट्रेस
मन शांत आहे की
आजूबाजूचं वातावरण
समुद्र जास्त अथांग आहेत
की सृष्टीची निर्मिती
मला खरंच कळत नाही