STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy

3  

Shobha Wagle

Tragedy

आई

आई

1 min
221

 हाक मारू 

कुणा आता

या जगती

नाही माता.


नाही मिळे

आता माया

झाली माझी

दीन काया.


माऊलीची

माया भारी

हरवली

आता सारी.


तुटे जीव 

आठवुनी

माऊलीला

ते स्मरुनी.


आई वदू

कुणा आता

पोरकी मी

विणा माता.


गोधडी मी

पांघरते

माय कुश

मी स्मरते.


स्मरुनी त्या

आठवणी

डोळां माझ्या

येई पाणी.


आई विणा

सुने जग

नाही मला 

माया मग.


जगी थोर

होती आई

कुणी आता

नाही माई.


आगर ते 

वात्सल्याचे

झाले रिते

संसाराचे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy